जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे वीर शहीद बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी #pombhurnaपोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे दिनांक १२ मार्च ला वीर शहीद बाबुराव शेडमाके यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला डॉ. सुधीर घुंगे अध्यक्ष म्हणून तर डॉ. आनंद देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बीएससी भाग अंतिम या वर्गातील आदित्य गेडाम या विद्यार्थ्यानी बाबुराव शेडमाके यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. बाबुराव शेडमाके यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून बाबुराव शेडमाके यांची प्रतिमा या विषयावर ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आली.

कार्यक्रमाचे संचलन बीएससी भाग अंतिम येथील विद्यार्थिनी कुमारी किरणची चिलमूलवार हिने केले तर आभार बीएससी भाग अंतिम ची विद्यार्थिनी कुमारी दिव्या कस्तुरे हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत