Top News

चेक आष्टा येथे चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न #pombhurna

पोंभुर्णा:- दिनांक 10 मार्च ते 16 मार्च 2022 या कालावधीत चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न झाले. "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मतदान जागृती याकरिता युवक" या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर चेक आष्टा येथे घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत दोंतुलवार सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून श्रमाचे संस्कार आपल्यावर झाले पाहिजे. शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. या संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे नेतृत्व घडत असते. गावाच्या विकासात आपला खारीचा वाटा आहे. प्रत्येक ठिकाणी युवक हा केंद्रस्थानी मानला जातो. राष्ट्रप्रेम देशभक्ती, देशसेवा हे आपले कर्तव्य आहे. याची जानिव करुन दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्राचार्य वेगिंवर चिंतामणी कॉलेज ऑफ साॕयन्स, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एन. एच. पठाण सर, प्रमूख अतिथी प्राचार्य नारनवरे, सरपंच कांता मडावी, उपसरपंच जगन्नाथ येलके उपस्थित होते.
या राष्ट्रीय योजना शिबिराची दैनंदिनी अशा प्रकारे होती. सकाळी 5.00 जागर, सकाळी 6.30 ते 7.30 व्यायाम व प्रार्थना, 7.30 ते 8.00 चहा /नास्ता, 8 ते 12 श्रमदान, 12 ते  1.30 ते वाजेपर्यंत भोजन, 4 वाजता बौद्धिक सत्र, 5 वाजता खेळ व जनसंपर्क असे कार्यक्रमाचे  नियोजन होते.
 
बौध्दिक सत्रात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान, ई.श्रमकार्ड उपक्रम, लोकशाही निवडणूका आणि सुशासन, या विषयांवर बौध्दिक सत्र घेन्यात आले.  
    दिनांक 15 मार्च रोज मंगळवार ला शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन .एच पठाण होते. प्रमुख उपस्थिती प्राचार्य नारनवरे, सरपंच कांता मडावी, उपसरपंच जगन्नाथ येलके, जि. प. मुख्याध्यापक यामावर, माजी सरपंच तथा सदस्य जयंत पिंपळशेंडे, ग्रामपंचायत सदस्य जिवनदास कुंभरे, प्रा. नितीन उपर्वट, प्रा. चौधरी, तसेच ग्रा. प. सदस्य उपस्थित होते.
   
    10 विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. घोडेस्वार यांनी केले. प्राचार्य पठाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मन, मनगट आणि मस्तिष्क या तीन गोष्टीचा आपण विकास केल्यास तुमचे जीवन यशस्वी होऊ शकते. असा महत्त्वाचा सल्ला दिला. आई-वडिलांच्या तुमच्याबद्दल फार मोठे स्वप्न असतात .ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
   
    या कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरवाडे यांनी केले  तर आभार डॉ. बावनकुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने