सोनापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर संपन्न #pombhurna

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर यांचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दत्तक ग्राम सोनापूर येथे दिनांक 21 मार्च ते 27 मार्च 2022 दरम्यान संपन्न झाले.
या शिबिरामध्ये ग्राम स्वच्छते सोबतच व्यसनमुक्ती वर विचारवंतांचे मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे क्षयरोग, रक्त तपासणी, दंतचिकित्सा त्याचप्रमाणे पशुचिकित्सा आणि त्यांचे लसीकरण ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे गावकऱ्यांमध्ये मतदान जनजागृती आणि स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. क्षयरोग दिनाचे औचित्य साधून या दरम्यान स्वयंसेवकांनी गावामधे क्षयरोग मुक्त उन्मुलन सर्वे करण्यात याला.

    या शिबीरात बौद्धिक सत्रा मधे डॉ. परमानंद बावणकुळे सरांचे ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन झाले तर अॕड. वर्षा जामदार यांनी स्पर्धा परिक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची टक्केवारी याविषयावर तर डॉ. विकास कानकटे सर यांचे जनावरांचे आरोग्य यावर व्याख्यान याचा लाभ गावकरी आणि स्वयंसेवक यांना व्हावा हा या शिबीराचा मुख्य उद्देश आहे.   
   
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार, गावचे सरपंच सौ. किरण डाखरे, त्याचप्रमाणे उपसरपंच रमेश कुमरे, पोलिस पाटील भाऊराव पिंपळशेंडे उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशिल कुमार पाठक सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल गर्गेलवार, प्रा. वर्षा शेवटे त्याचप्रमाणे समस्त ग्रामवासी, स्वयंसेवक, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत