Top News

गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रात्रीच्या गस्तीवर; वाळू माफियांचे धाबे दणाणले #pombhurna


चिंतलधाबा गावाजवळ रात्री 1 वाजता कारवाई

तीनही गाड्या जप्त करून तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे जमा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामधील चेक बल्लारपूर 1 आणि चेक बल्लारपूर 2 या दोन रेतीघाटासंबंधी प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी संजयकुमार डव्हळे यांनी रात्री या घाटांवर सफल कारवाई केली. त्यानुसार चिंतलधाबा गावाजवळ रात्री 1 वाजता अचानक कारवाई दरम्यान तीन हायवा अवैध आढळून आल्या.
त्यापैकी दोन हायवा विना रॉयल्टी वाहतूक करीत असताना आढळल्या. तर एक हायवा क्रमांक विहित वेळेनंतर वाहतूक करताना आढळली. त्यामुळे तीनही गाड्या जप्त करून तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे जमा करण्यात आल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी रात्री येऊन कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. मर्यादित परवाना असताना अतिरिक्त वाळूचा उपसा केला जातो. यामुळं शासनाचा महसूल बुडतो. ठेकेदार गब्बर होतात. अशाप्रकारे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असते. वाळूचे विशिष्ट घाट असतात. या घाटांवरून वाळू काढली जाते. त्यासाठी विशिष्ट ब्रास वाळू उपशाची परवानगी असते. परंतु, काही वाळूमाफिये अतिरिक्त उपसा करतात. यामुळं दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर गोंडपिंपरीचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी ही कारवाई केली.
 तीनही गाड्या जप्त करून तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे जमा करण्यात आल्या. त्यामुळं वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई रात्री करण्यात आली. अशावेळी वाळूमाफिये दगाधोपा करू शकतात. तरीही धोका पत्करून उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने