त्या 22 वर्षीय युवतीच्या हत्याकांडातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात #chandrapur
चंद्रपूर:- आठवडाभरापूर्वी भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र, आढळून आलेला त्या 22 वर्षीय तरूणीच्या मारेक-याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. शंकर शेखर कुरवान ( वय 26) रा. भद्रावती असे आरोपीचे नाव आहे.

त्या 22 वर्षीय युवतीच्या हत्येनंतर तो युवक पसार झाला होता, 3 एप्रिलला ती 22 वर्षीय युवती त्या युवकाच्या दुचाकीवर बसून भद्रावती येथे गेली त्याठिकाणी सदर हत्याकांड घडले.
काजल नावाच्या तरूणीची आठवडाभरापूर्वी हत्या करून आरोपी फरार होति. काल रात्री बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दुचाकी उभी करून तो केरळला पळून जाण्याच्या तयारीत होता. स्थानिक गुन्हे शाखेला सदर आरोपी पळून जाण्याचच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत