Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ॲड. निनाद येरणे यांच्या कारला अपघात #accident


राजुरा:- राजुरा येथिल प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. निनाद येरणे ह्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या नागपुर येथील व्यापाऱ्याच्या कार ने धडक बसल्याची माहिती प्राप्त झाली असुन अपघातात ॲड. निनाद येरणे तसेच कोरपना न्यायालयातील सरकारी वकील ॲड. प्रीती आमटे ह्यांना किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 5 एप्रिल रोजी न्यायालयीन कामकाजाकरीता राजुरा येथिल प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. निनाद येरणे आपल्या कार क्र. MH 34 BR 6669 ने कोरपना येथे गेले होते. आपले कामकाज आटोपुन दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजुरा येथे परत येत असताना चंदनवाही ते पांढरपोवनी दरम्यान नागपुर येथील कापड व्यापारी गिडवाणी आपल्या MH31CM 5382 क्रमांकाच्या कारने भरधाव वेगाने गडचांदुरच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲड. निनाद येरणे ह्यांच्या कारला जोरदार धडक बसली.
अचानक आपली बाजु सोडुन समोरून आलेल्या कार ने जोरदार धडक बसल्याने ॲड. निनाद येरणे ह्यांच्या पायाला दुखापत झाली असुन त्यांच्यासह कार मधे असलेल्या कोरपना येथिल सरकारी वकील ॲड. प्रीती आमटे ह्यांनाही दुखापत झाली असल्याचे कळले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन पोलीस कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत