Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ED ची मोठी कारवाई #ED

खा. संजय राऊतांची मालमत्ता जप्त
मुंबई:- ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

१ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई -

ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
किरीट सोमय्यांचे संजय राऊतांवर आरोप -

संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आले आहे, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. त्यानंतर राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीची छापेमारी झाली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत