Top News

अंतरगावात बोगस मजूर दाखवून निधीची अफरातफर #saoli #saolinews

नागरिकांची संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली तालुक्यातील अंतरगाव येथे वृक्ष लागवडीच्या कामावर बोगस मजूर दाखवून सेवकाने शासनाच्या निधीची अफरातफर केली असल्याची तक्रार गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत मजुरांची हेराफेरी करण्यात आली असून, कामावर मजूर नसताना त्यांचे मस्टर भरून रकमेची उचल केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
गावातील शंकर धंदरे यांचे किराणा दुकान असून, ते कधीही कामावर गेलेले नाही. पुरुषोत्तम आपलवार यांचेही पानटपरीचे दुकान आहे. ते वृक्षलागवडीच्या किंवा मातीकामावर गेलेले नाही. गणेश आपलवार, नामदेव चेकबंडलवार, सचिन ढवळे, उत्तम साखरे, राजेंद्र ढवळे हे व्यक्ती कामावर गेले नसताना रोजगार सेवक धनराज हिरामण ढवळे यांनी बोगस मस्टर तयार करून त्यांच्या नावावर रकमेची उचल केली आहे. धनराज ढवळे हे सेवा सहकारी सोसायटीमध्ये खतविक्रेता म्हणून कार्यरत असताना ४ लाखांची अफरातफर केली होती. त्यांच्यावर सावलीच्या न्यायालयात फौजदारी खटला सुरू आहे. असे असताना रोजगार सेवक पदाच्या काळातही त्यांनी बोगस मजूर दाखवून अफरातफर केल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करून शासनाच्या निधीची लूट थांबवावी, असे तक्रारीत म्हटले असून, रोजगार सेवकाला कामावरून काढून टाकावे, अशा आशयाची तक्रार कार्यकारी अधिकाऱ्याकड़े दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने