जाहिरात... Advertisement... विज्ञापन

'पुष्पा.... पुष्पाराज.... अपून लिखेगा नहीं...' #Pushpa


एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा फिल्मचा डायलॉग लिहिला
मुंबई:- सध्या परीक्षांचा कालावधी आहे. बऱ्याच शाळांसोबत दहावी बारावीच्याही परीक्षा सुरू आहेत. परीक्षा म्हटलं की कॉपीची काही प्रकरणं समोर येतात. पण सध्या सोशल मीडियावर असं प्रकरण समोर आलं आहे. ज्याचा आपण विचारही केला नसेल. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा फिल्मचा डायलॉग लिहिला आहे. हे पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. पुष्पा फिल्ममधील अल्लु अर्जुनचा 'पुष्पा...पुष्पराज.... मैं झुकेगा नहीं' हा डायलॉग चांगलाच फेमस झाला.


सोशल मीडियावर याचे रिल्स येऊ लागले. पण आता हा डायलॉग रिल्सपुरता मर्यादित राहिला नाही. तर रिअॅलिटीतही उतरला आहे. एका विद्यार्थ्यावर पुष्पाचा असा फिव्हर चढला की त्याने चक्क आपल्या उत्तरपत्रिकेत हा डायलॉग आपल्या टचसह लिहिला आहे.
फेसबुकवर या उत्तरपत्रिकेच्या फोटोची पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यात 'पुष्पा... पुष्पराज... अपुन लिखेगा नहीं साला', असं लिहिलं आहे.
त्याशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होते खरी. पण ती कोणत्या परीक्षेतील, कोणत्या राज्यातील आहे हे माहिती नाही.
एकतर बऱ्याच कालावधीनंतर शाळा-कॉलेज सुरळीत झाले आहेत. परीक्षा होत आहेत. त्यात या अशा उत्तपत्रिका मजेशीर वाटत असतील पण हे चिंताजनक आहे. या मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत