जाहिरात... Advertisement... विज्ञापन

थंडाव्यासाठी अंगणात झोपला असताना बिबट्याचा हल्ला #attack

चंद्रपूर:- राज्यात उष्णतेचा पार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी उष्णतेवर मात करण्यासाठी एसी लावण्यात येतो. मात्र ग्रामीण भागातील काही लोक घरच्या अंगणात झोपतात. थंडाव्यासाठी अंगणात झोपणे चंद्रपूर येथे एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे.
घरात उकडत असल्याने माणिक बुद्धा नन्नावरे (70) हे रात्री त्यांच्या अंगणात झोपले होते. यावेळी रात्री जंगलातून अचानक बिबट्या आला यावेळी या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जागीच ठार केले. दुसऱ्यादिवशी सकाळी गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सरडपार चक येथे हि घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून, जंगलातील वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला आहे.अंगाची लाही लाही सूरू आहे.ग्रामीण भागात नैसर्गिक थंड हवेसाठी गावकरी रात्री अंगणात झोपी जातात. सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथिल 70 वर्षिय माणिक बुध्दा नन्नावरे हे अंगणात झोपले होते.त्याच दरम्यान बिबट्याने हल्ला केला.या हल्यात नन्नावरे यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वनविभागाला घटनेची माहीती देण्यात आली आहे, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सूरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे दोघांना बिबट्याने उचलले होते. ही घटना ताजी असतानाच सिंदेवाही तालुक्यात पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत