Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पंकज भाऊंनी स्वःताच्या खर्चानी विरूर स्टेशन येथे पाणपोई केली सुविधा #rajura


राजुरा:- पंकज उपल्लांचीवार स्वःताच्या खर्चानी विरूर येथे पाणपोई सुविधा उपलब्ध केली. राजुरा तालुका अंतर्गत विरूर स्टेशन येथे आज ही सामाजिक माध्यमातून अनेक लोक आपले कार्य करीत असतात तसेच विरूर स्टेशन येथे पण एका व्यापारी ने तापत्या उनासाठी पंकज चंदू उपल्लांचीवार यांनी नागरिकांकरिता बस स्थानक जवळ एक तर डोंगरगाव मार्ग जाणाऱ्या बस स्थानक जवळ एक पाणपोई ची सुविधा केली आहे.
उन्हाळा म्हणजे पाण्याची कमतरता असते आणि लहान मुले व वयस्कर व्यक्ती ना टाईम वरती पाणी नाही मिळाला तर त्यांची अवस्था फार गंभीर होते आणि चंद्रपूर जिल्हा हा सर्वात तापलेला जिल्हा आहे आणि 2 वर्षा पासून पंकज भाऊ हा कार्यक्रम राभवित आहे. आणि प्रत्येक सामाजिक कामाला होईल तेवढी मदत करत असतात त्यांच्या या कार्याची प्रशंसा कितीही केली तेवढी कमी आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या या कार्याला अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत