चार दिवस लोटूनही तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली नाही #bhadrawati #murder

Bhairav Diwase
भद्रावती:- विवस्त्र तरुणीचे धडापासून शिर वेगळे करून तिची हत्या करण्यात आली. या तरुणीचे चार दिवस लोटूनही शिर न मिळाल्याने तरुणी कोण आहे, हेच पोलिसांना कळू शकले नाही. शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ती तरुणी कोण, शहरातील की जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील की परप्रांतातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
या घटनेच्या तपासासाठी पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक, अधिकाऱ्यासह जवळपास दोनशे पोलीस तपासाच्या कामी लागले आहेत. वेगवेगळ्या दिशेने तपास चक्रे फिरविण्यात येत असून लवकरच प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
मृत तरुणीचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. ते शिर तिथे कुठेच आढळले नाही. तरुणीचे शिर वेगळे करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव तिथे होणे अपेक्षित आहे. मात्र, घटनास्थळावर त्या प्रमाणात रक्त आढळले नाही. त्यामुळे या तरुणीची आधी इतरत्र हत्या करून धड घटनास्थळी फेकले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.