Top News

संजीवनी फाऊंडेशन चंद्रपुर २०२२ नवनियुक्त कार्यकारणीची घोषणा #chandrapur

चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी,महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदु ठरलेली संस्था म्हणजे संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.संजीवनी फाऊंडेशन संपूर्ण महाराष्ट्रभर नवनवीन सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते.समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजातील प्रत्येकासाठी नाविण्यपूर्ण कार्य करण्यासाठी संजीवनी फाऊंडेशन नेहमीच तत्पर असते.अशीच नवी ऊर्जा घेऊन नव्या टीम सोबत नवी सुरुवात संजीवनी परिवार चंद्रपुर करित आहे.दिनांक ०६-०४-२०२२ ला सरदार पटेल महाविद्यालय येथे,संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,नागपुर विभाग अंतर्गत जिल्हा चंद्रपुर येथील,संजीवनी फाऊंडेशन चंद्रपुर महानगर व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर या दोन्ही नवनियुक्त वर्ष २०२२-२३ कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.
घोषणा ही संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य विस्तार समिती अध्यक्ष राजेशजी हजारे यांनी केली.या प्रसंगी संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य विस्तार समिती उपाध्यक्ष इजाजजी शेख,संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य नागपुर विभाग विश्वस्त शुभमजी निंबाळकर आणि आकाशजी वानखेडे उपस्थित होते.चंद्रपुर महानगर अध्यक्ष म्हणुन अविनाश चोले यांची नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष दर्शन मेश्राम,सचिव रुंचीता टोकलवार,कोषाध्यक्ष साहिल चौधरी,प्रसिद्धी प्रमुख अंकिता कटकट,संघटक करण झाडे,विश्वस्त संजना गाजंगवार,सदस्य कृष्णा भिसे,अक्षय मशाखेत्री,सुरक्षा गोवर्धण यांची नियुक्ती करण्यात आली.या सोबतच सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर अध्यक्ष म्हणुन सिध्दांत निमसरकार यांची नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष ज्योती निषाद,सचिव मोहिनी चावले,कोषाध्यक्ष समीक्षा कुरेकार,संघटक अजय मोहुर्ले,प्रसिद्धी प्रमुख काजल मुंनगेलवार,विश्वस्त वैभव निंबाळकर,सदस्य आकांशा चहारे,नंदिनी नरनावरे,प्रांजली निपुंगे,सुमेधा वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी संजीवनी फाऊंडेशनचा विकास व विस्तार करण्यास प्रयत्नशील राहु असा निर्णय नवनियुक्त सदस्यांनी घेतला.संपूर्ण नियुक्त टीमचे शैक्षणिक क्षेत्रातून व संजीवनी परिवार तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने