जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेस खासदारासह आमदारांनी घेतली राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधींची भेट #chandrapur #congress


चंद्रपूर:- राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची बुधवारी (दि. ०६) सदिच्छा भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे तसेच विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती होती.
आमदारांच्या शिष्टमंडळाने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही भेट घेतली. महाराष्ट्र राज्य विधानसभेतील काँग्रेसच्या अन्य सहकारी आमदारांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या भेटीप्रसंगी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान आठ दिवसापूर्वीच या शिष्टमंडळाने पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांनी वेळ दिल्यानंतर, बुधवारी (दि. ०६) दिल्लीत काँग्रेसच्या खासदारासह काही आमदारांनी भेट घेऊन देश आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्र राज्यातील राजकीय बदलासंदर्भात ही विशेष भेट होणार होती. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत