ताडोबा भ्रमंतीचा शेकडो विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला आनंद #bhadrawati

Bhairav Diwase

भद्रावती:- जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भ्रमंती करून भद्रावती तालुक्यातील विविध शाळांच्या शेकडो विद्यार्थी व शिक्षकांनी ताडोबा वनातील प्राणी आणि वनस्पतींचे दर्शन करून आनंद घेतला.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबा वनपरिक्षेत्रांअंतर्गत येणाऱ्या खुटवंडा , घोसरी , सोनेगाव , मुधोली , काटवल ( तु ) , वडाळा , कोकेवाडा ( मा ) , विलोडा , आष्टा , कोकेवाडा ( तु ) , किन्हाळा , अर्जुनी , वायगाव ( भो ) येथील शाळेतील २८६ विद्यार्थी व १६ शिक्षक यांना दि.१८ ते २३ एप्रिल पर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या मिनीबस ने खुटवंडा व मोहुर्ली गेट वरून सकाळ फेरी व दुपार फेरीत प्रवेश देऊन त्यांना भ्रमंतीमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वनस्पती याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सौरभ दंदे आणि जगदिश धारणे यांनी मार्गदर्शन केले.
भ्रमंती दरम्यान वाघ, अस्वल, मगर, सांबर, चितळ, निलगाय, रानगवा, बंदर, भेकर इत्यादी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. भ्रमंती दरम्यान विदयार्थी व शिक्षक यांची नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दि. २१ ते २३ एप्रिल पर्यंत मौजा आष्टा, मुधोली, विलोडा, अर्जुनी, येथील खाजगी शाळेतील इयता ८ वी व ९ वी चे १३२ विद्यार्थी व ८ शिक्षक यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मिनीबस ने मोहुर्ली येथे नेऊन मोहुर्ली सभागृहामध्ये पूर्ण दिवस पर्यावरण जाणीव जागृती शिबिरामध्ये मार्गदर्शन करून दुपार फेरीमध्ये मोहुर्ली पर्यटन गेट वरून वनभ्रमंती करीता नेण्यात आले. भ्रमंतीमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वनस्पती याबाबत वन अधिकारी व वनकर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. भ्रमंती दरम्यान त्यांनासुद्धा वाघ, अस्वल, मगर, सांबर, चितळ, निलगाय, रानगवा, बंदर, भेकर इत्यादी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. दि. २३ एप्रिल रोजी मोहुर्ली सभागृहामध्ये शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) ताडोबा एस. के. शेंडे यांनी केले. त्यानंतर पर्यावरण जाणीव जागृती शिबीर समारोपीय कार्यक्रमात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) चंद्रपुरचे उपसंचालक एन. व्ही. काळे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सहाय्यक वनसंरक्षक एम. सी. खोरे, सहाय्यक संचालक संजय करकरे व शिक्षण अधिकारी संपदा करकरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शिबीर व सफारी करण्यामागचा उद्देश समजावून मार्गदर्शन केले.
शिबीरा दरम्यान नास्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर सफारी व शिबीर क्षेत्र संचालक , उपसंचालक ( कोर ) , सहाय्यक वनसंरक्षक ( कोर ) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर , यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) ताडोबा एस. के. शेंडे, क्षेत्र सहाय्यक काटेझरी व्ही. डी. कामटकर, क्षेत्र सहाय्यक सोनेगाव एस. एम. नन्नावरे , ओ . ए . धात्रक, आर. बी. वघारे , एन . बी . लटपटे , के . एच . लटपटे , पी . आर . कोसुरकर , व्ही . बी . मडावी , एन . डी . जुड़े , व वाहन चालक यांनी यशस्वीरित्या पार पाडले .