Top News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अधिवेशन थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अधिवेशन थाटात संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
हिंगणा- नागपूर) :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशन नागपूर येथील वनामती सभागृहामध्ये अतिशय थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरे झाले. नागपुरचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षपदी म.रा. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे होते. तर आमदार राजुभाऊ पारवे, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे व दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक प्रमुख पाहुणे होते. पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन झाल्यानंतर
पुर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्रा. महेश पानसे यांनी संपादन केलेल्या विशेषांक 2022 चे उदघाटन उपस्थित मान्यवरांचे हस्ते झाले.


          विवीध क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यगौरव, महाराष्ट्र भुषण, गोंडवाना गौरव, विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात संपादक श्रीकुष्ण चांडक, गाव गणराज्य परिषद मोहगाव, गडचिरोलीचे अध्यक्ष सरपंचा शर्मिला रामटेके, प्रा.महेश पानसे, संपादक आनंद शर्मा, आदी मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.


 द्वितीय चर्चासत्रामध्ये "वर्तमानपत्राचे अर्थकारण" यावर मनोगत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी सुद्धा म.रा.पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे अध्यक्षपदी होते. तर दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत, दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक भाष्कर लोंढे, दैनिक राष्ट्रप्रकाशचे संपादक सुदर्शन चक्रधर व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शब्बीर विद्रोही उपस्थित होते. या अधिवेशनात विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, सरचिटणीस शरद नागदेवे, संघटक, संयुक्त गांव गणराज्य परिषद, सुनिल बोकडे, नयन मोंढे, सदाशिव ढेंगे, अॕड. सौ.शर्मिला रामटेके या सर्वांचा गौरव करण्यात आला. 


सोबतच प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे साहेबांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राजुरा तालुका अध्यक्ष पदी ॲड. राहुल थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद सलीम यांनी तर प्रास्ताविक पुर्व-विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे व आभार निलेश सोमानीव राहूल मैंद यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने