Top News

खासदार धानोरकरांच्या बंगल्यात घरफोडी #arrested

२४ तासांच्या आत तिघांना अटक
चंद्रपूर:- गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाला आहे. आता तर चोरट्यांनी चक्क खासदारांचा बंगालच फोडला. सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र त्यांनी घरातील कपाट फोडले, सामानांची नासधुस केली. यावेळी केवळ चौकीदार आणि त्यांची पत्नीच बंगाल्यात होता. ही घटना मंगळवारच्या रात्री घडला.


कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना सरकार नगर येथे सुर्यकिरण नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता कार्यालय दुसरीकडे हलिवले. मात्र निवासासाठी खासदार धानोरकर यांचा वापर करतात. मंगळवारला ते मुक्कामी नव्हते. ते रात्री वरोऱ्याला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांना या बंगल्याच्या चौकीदारांने भ्रमणध्ननीवर संपर्क साधला आणि बंगला फोडल्याची माहिती दिली.
रात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी बंगाल्याचे मुख्यद्वाराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. त्यांना बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे उद्निग्न होवून त्यांनी सामानाची नासधूस केली. कपाट फोडले. झाल्या प्रकाराची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्याच रात्री सरकार नगर परिसरात आणखी दोन घरफोड्या झाल्या होत्या. खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडल्याने पोलिस यंत्रणाही हादरली. त्यांनी बंगाल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तिघे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले.
पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या तिघांना अटक केली. रोहीत इमलकर (वय २४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (वय २०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (वय २०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील खून, चोरींच्या घटना वाढल्या आहे.
यापार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बंगाल लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यामुळे सरकार नगर परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होता. त्यांनी खासदार येतात कधी. मुक्कामी कधी असतात, याची खडानखडी माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगाल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट केले. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने