भाजपा भारतमातेच्या परमवैभवसाठी आयुष्य वेचणाऱ्यांचा पक्ष #bjpchandrapur

Bhairav Diwase

भाजपा स्थापनादिनाला डॉ. मंगेश गुलवाडे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर:- तेरा वैभव अमर रहे माँ,हम दिन चार रहे ना रहे.. हे ब्रीद अंगीकारून भाजपाची 80 च्या दशकात स्थापना झाली. आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. दरम्यान अनेकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले. त्याची म्हणून केंद्रात व 25 राज्यात भाजपाची सत्ता आहे. भाजपा देशासाठी आयुष्य वेचाणाऱ्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते जैन भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या 42 व्या स्थापनादिनानिमित्य महानगर भाजपा तर्फे आयोजित 'पक्षश्रेष्ठींना अभिवादन' कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार, संघटनमंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा नेते रामजी लखीया, मनोज सिंघवी, विशाल निंबाळकर, भारती दुधानी, संगीता खांडेकर, शिल्पा देशकर, अंजली घोटेकर, सचिन कोतपल्लीवार, सुरज पेद्दुलवार, सुर्यकांत कुचनवार रितेश वर्मा, पूनम तिवारी, ऍड. हरीश मंचलवार, दिवाकर पुद्दटवार, रवी लोणकर, प्रदीप किरमे, संदीप आगलावे, नितीन कारिया, संजय तिवारी, संतोष वडपल्लीवार, भाऊराव उताणे, शशीभूषण पांडेय, अनुप शर्मा, रेणूताई घोडेस्वार, रंजीता येले, वंदना डाखोरे, कोमल वासेकर, मनीषा शर्मा, राजू जोशी, राजकुमार पाठक, जीवन नंदनवार, मोहन मंचलवार संदीप रत्नपारखी, गणेश रामगुंडवार, यश बांगडे, गोविंदा गंपावार, प्रमोद शास्त्रकार, अरविंद कोलंकर, मनोरंजन रॉय, रामजी हरणे, दिनकर सोमलकर, रामकुमार आक्केपल्लीवार, मनोज सिंघवी, परितोष मिस्त्री, सुनील हरणे, सत्यम गाणार, पंकज हलदार, स्वप्नील सोरते, गणेश रासपायले, चांद पाशा सय्यद, शिवम कपूर, महेश कोलावार, सुभाष धवस, प्रणय डंबारे, हेमंत गुहे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आ.मुनगंटीवार यांच्या विकासाची गाथा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. याच प्रसंगी सकाळी 10 च्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. संचलन व प्रास्ताविक सूरज पेदूलवार यांनी केले. सुभाष कासनगोट्टूवार यांनी आभार मानले.