जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार #attack

राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे ताकसांडे परिवारात शेतीच्या वाटणी वरून वारंवार वाद होत होते आणि काल 6 एप्रिल ला दुपारच्या सुमारास वेंकटेश आपल्या आईला घेऊन भाऊ चे घरी दीपक ताकसांडे यांच्या घरी शेतीच्या वाटणी वरून चर्चा करण्या करिता गेला. चर्चेत वाद निर्माण झाला आणि दीपक यांने आपल्या भावा वरती कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता वेंकटेश तिथून पडुन गेला आणि वेंकटेश ची आई लक्ष्मी बाई मात्र तिथेच असल्याने दीपक ने लक्ष्मी बाई ला कोयत्याने वार करून जखमी केले.
वादाची सुरुवात होताच गावकऱ्यांनी विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण यांना माहिती दिली होती. आणि लगेच ताबडतोब ठाणेदार चव्हाण व कर्मचारी बीट मेजर भुजंग कुरसंगे मलाया नारगेवार. शिपाई. अशोक.दिपाली.विजू मुंडे. तलांडे. मोक्यावर्ती पोहचले आणि एक मोठा अपघात होण्याआधीच थांबवण्यात आला व आरोपी दीपक व कुलवंत यांना अटक करण्यात आले.
जखमी महिला लक्ष्मी बाई यांना उप जिल्हा रुग्णालय इथे उपचार करिता पाठवण्यात आले व घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली व आरोपी विरुद्ध कलम 307 504 506 आणि आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत