Top News

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न.(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा - राज्यशास्त्र विभाग श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या वतीने बड्या राष्ट्रांचा विस्तारवाद आणि जागतिक संघटनांची कार्यप्रणाली या विषयावर आंतरविद्या शाखीय आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरविंद येलारी सर,सहयोगी प्राध्यापक पेकिंग युनि्हर्सिटी बीजिंग ( चीन ) तसेच मुख्य वक्ता म्हणून डॉ. लेनिन कुमार सहाय्यक प्राध्यापक एम.आय. टी. शासकीय विद्यापीठ, पुणे तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी वारकड ,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्र सदाशिव मुद्दमवार तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी, आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी, डॉ संजय शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.अरविंद येलारी विषयाची मांडणी करताना सद्या जागतिक पातळीवर सुरू असलेले रशिया - युक्रेन युद्ध आणि या युद्धाची संपूर्ण जगाला पोहोचणारी झळ आणि याचे होणारे परिणाम तथा जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संघटना व या संघटनांची कार्यप्रणाली व भूमिका कशी आहे आणि कशाप्रकारे असायला पाहिजे इतकेच नाही तर अमेरिका, भारत, आस्ट्रलिया, जपान इंग्लंड अशा अनेक बड्या राष्ट्रांची भूमिका आणि योगदान काय असायला पाहिजे इतकेच नव्हे तर सध्या अस्तित्वात असलेली नाटो संघटना नेमकी काय भूमिका घेणार यावर आपले महत्वपूर्ण विचार मांडले. तसेच डॉ. लेनिन कुमार आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, जगात सुरू असलेले रशिया - युक्रेन युद्ध आणि या युद्धाचे संपूर्ण जगावर होणारा परिणाम आणि दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आंतर राष्ट्रीय संघटना यांची कार्यप्रणाली आणि भूमिका तसेच सध्या अस्तित्वात असलेली नाटो संघटना यांची भूमिका कशी असायला पाहिजे, जगात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंड भारत यांची भूमिका नेमकी काय असायला हवी अशाप्रकारचे अतिशय महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. या आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वेबिनर साठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर चीन तसेच इतर देशांतून फार मोठ्या प्रमाणात( जवळपास ४०० ) प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या वेबिनार  मध्ये अनेक प्रश्नावर चर्चा सुद्धा करण्यात आली, एकंदरीत हा वेबिनार अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी उपयुक्त ठरला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी वारकड सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजेंद्र मुद्दमवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ संजय शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सुवर्णा नलगे यांनी मानले. हा वेबिणार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ राजेश खेरानी, डॉ. मल्लेश रेड्डी, डॉ.संजय शेंडे, डॉ. नागनाथ मणुरे, डॉ.विशाल दुधे, प्रा. विठ्ठल आत्राम, प्रा. गुरुदास बल्की, प्रा. सुवर्णा नलगे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी  अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने