Top News

वाघाच्या दहशतीत असलेल्या गावांना माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी दिली भेट #Rajura


शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य मोबदला देण्याची केली मागणी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- मागील काही दिवसांपासून गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव जी.प.क्षेत्रात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. तोहगाव गावचा एक बैल,वेजगाव येथील 7 बकऱ्यावर हमला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
सदर माहिती मिळताच माजी आमदार अँड.संजय भाऊ धोटे यांनी तोहगाव व वेजगाव या गावातील शेतकऱ्याची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.तोहगांव येथील शेतकरी श्री.बंडू गोविंदा यांचे वाघाच्या हल्या मध्ये बैल जखमी झाले,आर्वी गावातील संजय गिरसावळे यांचे बैल जखमी झाले तसेच जीवनदास गिरसावळे यांची वाघाच्या हल्ल्यात म्हैस व वगार मरण पावले व सिताराम नांदे यांचे बैल जखमी झाले आहे,


नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जखमी झालेल्या व मरण पावलेल्या जनावरांच्या मालकास योग्य मोबदला देण्यात यावे अशी मागणी केली व त्या करिता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा नेते सुरेश धोटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे,प्रकाश उत्तरवार, माजी सरपंच हंसराज रागीट,माजी उपसभापती पंचायत समिती गोंडपीपरी मनीष वासमवार,गणपती चौधरी सर,गणेश डहाळे,श्री.कोटनाके व भाजपा कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने