जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणे आनंददायक #chandrapur


भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार
चंद्रपूर:- भारतीय जनता पक्ष स्थापना दिनानिमित्त भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी घरावर पक्षाचे ध्वज उभारुन स्थापना दिवस साजरा केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना कोलावार म्हणाले की,६ एप्रिल १९८० मध्ये पक्षाची स्थापना झाली.त्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी जबाबदारी स्वीकारली.४२ वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर चारवेळा व प्रादेशिक स्तरावर १२ राज्यात भारतीय जनता पक्षांनी सरकार स्थापन केले.जगात सगळ्यात जास्त कार्यकर्ता व मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणे आनंददायक आहे.
मागील १३ वर्षापासून मी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करतोय.
आजपर्यंत चार विधानसभा क्षेञात कार्यकर्ता म्हणून वावरण्याचा आनंद आहे.त्यात ९ वर्ष केवळ कार्यकर्ता म्हणून कार्य करीत असतांना पक्षांनी ३ वर्षापूर्वी भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्षाची जबाबदारी व त्यानंतर भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी दिली.हे दोन्हीही जबाबदारी मला जमेल तसं प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न केला.
या मागील तीन वर्षाच्या कालावधीत अनेक समस्यांवर निवेदनाच्या माध्यमातून वरीष्ठ नेत्यांकडून व सरकारी अधिका-यांच्या सहाय्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
मग ते विद्यार्थ्यांचे स्काॅलरशीपची तारीख वाढविण्याबाबतचे प्रश्न असो,शेतक-यांना वेळेवर कर्ज मिळण्याबाबतचे प्रश्न असो,बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याबाबतची मागणी असो, अनुकंपधारकांची भर्ती प्रक्रिया राबविण्याबाबतची मागणी असो, मोबाईलवरील पब्जीचे गेम बंद करण्याबाबतची मागणी असो किंवा कोवीड काळात काही ठिकाणी बस फे-या वाढविण्याबाबतची मागणी असो अश्या अनेक मुद्यांवर मी सातत्याने माझ्या परीने निवेदन देऊन तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रश्नांना न्याय देखील मिळाला आहे.
आणि काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
त्यावरही वरीष्ठ नेत्यांच्या सहाय्याने तोडगा काढण्याचे प्रयत्न नेहमी माझे चालूच असतात.यापुढेही पक्षानी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडणार अशी भावना महेश कोलावार यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत