वर्गात नव्हती आपली
एवढी एकमेकांशी दोस्ती
पण आता आठवतेय यार
केलेली ती सगळी मस्ती
परत एकदा भेटूया ना यार
वर्गातल्या प्रत्येकाची
एन्ट्रीच होती भारी
कधी कधी एन्जॉय केलीय
वर्गातली मारामारी
परत एकदा भेटूया ना यार
होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप
कारण होतेच सगळे तसे कलाकार
पण आज प्रत्येक क्षणाला तुमची
आठवण येते यार
परत एकदा भेटूया ना यार
आयुष्याच्या एका टोकावर झालो
आपण वेगळे
आपापल्या कामामध्ये आता
गर्क असतो सगळे
परत एकदा भेटूया ना यार
मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुषतील न
संपणारी साठवण
परत एकदा भेटूया ना यार
कॉलेजमधेही भेटले मित्र
करतो आताही मस्ती
पण शाळेमधल्या दोस्तीची
गोष्टच होती वेगळी
परत एकदा भेटूया ना यार