भोयगाव गावाजवळ चालता ट्रक पेटून खाक #fire #firenews

Bhairav Diwase
कोरपना:- कोरपना व राजुरा तालुका हा कोळसा खदानीने व्यापलेला असून तालुक्यामध्ये सास्ती, गोवरी, पवनी, व पैनगंगा अशा कोळसा खाणी आहे.
साखरी कोळसा खदान येथून धारीवाल कंपनीमध्ये चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच 40 बीजी 8090 ट्रकने कोळसा भरून जात असताना अचानक पेट घेतल्याने ट्रक जाग्यावर जळून खाक झाला.
घटनास्थळी अल्ट्राटेक कंपनीची अग्निशमन दल येऊन आग आटोक्यात आणली. या रस्त्यावर तरोडा, भोयगाव, साखरी व वरुडा या गावाच्या मध्यभागातून मार्ग जात असल्याने वाहनाने जर गावातच पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती. याची माहिती गडचांदूर पोलिसांना देण्यात आलेली असून पुढील तपास ठाणेदार आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.