Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोलिसांचा खबरी समजून नक्षलवाद्यांनी केली दोघांची हत्या #gadchiroli


गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली सक्रिय झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रात नक्षल्यांनी हल्ला करुन दोघांची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दोघांची हत्या नक्षलवाद्यांनी दगडाने डोके ठेचून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील हत्या झालेल्यापैकी एक व्यक्ती पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली आहे. तर दुसरा व्यक्ती आत्मसमर्पित नक्षली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात पहिला जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाला अजुन बारा तासही उलटण्याआधीच नक्षल्यांनी दोघांची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यामुळे आता पोलिसांनी नक्षल्यांची शोध मोहिम सुरु केली आहे. यासाठी पोलिसांनी कुमक वाढवली आहे. गडचिरोली येथील सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत