जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्रहारच्या मागणीला यश #Korpana

एका बाजूचा सिमेंट रस्ता रहदारीस सूरू
चंद्रपूर:- माणिकगड सिमेंट कंपनी गेट ते पेट्रोल पंप पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून खड्डेयुक्त होता त्या करीत ४५० कोटी या रस्त्याला मंजूर झाले आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून काही महिने पहिले प्रहार जनशक्ती पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन माणिकगड सिमेंट कंपनी गेट ते पेट्रोल पंप चौक पर्यंतच्या रस्ताचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. काम होत नसल्याने प्रहरच्या वतीनेआंदोलन सुद्धा करण्यात आले त्याची दखल घेऊन एकतर्फी सिमेंट रस्ता बनवण्यात आला. महिना लोटून सुद्धा रस्ता रहदारीस सुरू करण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना धुळीचा प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
प्रहारचे बिडकर यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन एका बाजूचा सिमेंट रस्ता वाहतुकीस सुरू करण्याची मागणी निवेदनात केली. त्याची दखल घेऊन एक बाजूचा सिमेंट रस्ता रहदारीस सुरू करण्यात आला. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा बिडकर यांनी दिला आहे.
सद्यस्थितीत एका बाजूचा सिमेंट रस्ता रहादरीस सुरवात करण्यात आला असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले
लवकरच दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रहारचे सतीश बिडकर यांना सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत