चंद्रपूर:- तोहोगाव येथे वाघाने आतापर्यंत 10 ते 15 पाळीव जणावरांना ठार केलेले आहे, त्यात गोरक्षनातील 6 जणावरे एकाच दिवशी मारले तर आज अगदी गावाला लागून असलेल्या बंडू मोरे याचे गोठ्यात बांधून असलेला एक बैल ठार केला तर दूसरा जखमी केलेला आहे.
जर या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर मानवाला सूद्धा धोका होऊ शकतो हे नाकारता येणार नाही, म्हणून लवकरात लवकर त्या वाघाला जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात किंवा इतरत्र हलविण्यात यावे या करीता वन विभागाने उपाय योजना करावी अशी मागणी भाजयुमो तोहोगाव चे सचिव रमेश राऊत यांनी केली आहे .
गावातील जनतेच्या मनात भितीचे वातवरण तयार झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा भाजपा युवा मोर्चा तोहोगाव चे नेत्रुत्वात गावकऱ्यांच्या उपस्थितीत वन विभाग विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.