Top News

शेतमजुराचा संशयास्पद मृत्यूने खळबळ #Rajura #death

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील नवेगाव चिंचाळा रस्त्याच्या कडेला एका 47 वर्षीय शेतमजुराचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली असून यात घातपात की नैसर्गिक मृत्यू याविषयी नागरिक चर्चा करताना दिसून येत आहे.

राजुरा तालुक्यातील येत असलेल्या केळझर येथील हनुमंत मानकु मडावी वय 47 हा विरूर येथील महेंद्र गोहने यांच्याकडे मागील दोन वर्षापासून शेतमजूर म्हणून काम करीत होता. गुढीपाडव्याला त्याचा वार्षिक हिशोब झाला होता, तेव्हापासून तो सतत रोज अतिमद्य प्राशन करीत होता. काल तो विरूर स्टेशन येथून मद्यप्राशन करून सायंकाळच्या सुमारास आपल्या गावाला सायकल ने गेला, मात्र सकाळी 6 वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी तो चिंचाळा नवेगाव या रोडवर पडून दिसला तेव्हा केळझर येथील पोलीस पाटील शिल्पा टोंगे यांनी या घटनेची माहिती विरूर पोलीस स्टेशनला दिली.

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोचले वा घटनेचा पंचनामा करून अकास्मिक मृत्यूची नोंद करून सदर मृतदेह शवविच्छेदन ना करिता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविण्यात आले.
यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता मृतकाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा घाव नाही. मृतक हा अतिमद्य प्राशन करून किंवा उष्माघाताने मरण असेल असा प्राथमिक अंदाज वर्तविला, मात्र वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच खरं काय समोर येणार असे सांगण्यात आले. विरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मर्ग दाखल केला.
या घटनेतील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मल्लया नर्गेवार, विजय मुंडे, अशोक मडावी, लक्ष्मीकांत खंडाळे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने