जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बल्लारपूरात विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही #accident #ballarpur

घटना सीसीटीव्हीत कैद
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात घडला आहे. मुख्य मार्गावर भरधाव वेगातील एक कार दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार उलटली. उलटलेली कार देखील उलटून पुन्हा सरळ होत मार्गावर स्थिरावली. विशेष म्हणजे कारमध्ये बसलेल्यांना कुठलीही इजा झाली नाही. अत्यंत भीषण अपघात होऊनही कोणालाही खरचटले देखील नाही. दरम्यान, ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अपघातग्रस्त कार यवतमाळमधील एका व्यापारी असल्याची माहिती मिळते. सदर व्यापारी आपल्या कारमधून कुटुंबासोबत सिरोंचाच्या दिशेने चालले होते. कारमधून एकूण चार लोक होते. बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर सदर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. सुदैव म्हणजे एवढा भयानक अपघात घडूनही दुचाकीस्वार किंवा कारमधील कुणालाही साधे खरचटले देखील नाही. दुचाकीस्वारही दुचाकी उटलून पुन्हा भरधाव वेगात निघून गेला. तर दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार उलटली. दुसऱ्या क्षणाला उलटलेली कार देखील उलटून पुन्हा सरळ होत मार्गावर स्थिरावली. अपघाताची अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण या घटनेने सार्थ केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत