'त्या' विशेष ग्रामसभेत दारू बाटली आडवी #pombhurna #police

Bhairav Diwase
चेक हत्तीबोडी ग्रामपंचायतीत दारू भट्टी नामंजूर

महिला व युवकांनी दारू भट्टीसाठी दर्शविला विरोध

पोलिसांना करावे लागले पाचारण
पोंभूर्णा :- तालुक्यातील चेक हत्तीबोडी ग्रामपंचायत परिसरात सरकार मान्य देशी दारू भट्टी सुरू करण्यावरून ग्रामस्थांचा रोष पाहायला मिळाला असून ग्रामपंचायतीने नाहरकतीसाठी बोलाविलेली ग्रामसभा धुळकावून लावत सरकार मान्य देशी दारू ला नाहरकत प्रमाणपत्र नामंजूर करण्यात आले. दरम्यान महिला व युवकांचा रोष बघता पोलिसांना पाचारण करून प्रकरण शांत करावे लागले.
चेक हत्तीबोडी ग्रामपंचायत परिसरात सरकार मान्य चिल्लर देशी दारूचे दुकान सुरू करण्याच्या संदर्भात मुंडीपार जि. गोंदिया येथील नरेंद्र दामोधर मेश्राम यांनी लायसन्स नंबर CL ||| १४ /२०२२/२३ नुसार नाहरकतीसाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने १७ मे ला जाहीरनामा प्रसिद्ध करून हरकत असल्यास आक्षेप घेण्यासंदर्भात आवाहन केले होते. डोंगर हळदी येथील युवा कार्यकर्ते विजय ढोले यांनी २७ युवकांना घेऊन आक्षेप नोंदविला होता. २५ मे ला ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा लावली मात्र चेक हत्तीबोडी ग्रामपंचायत परिसरातील महिला, युवक व ग्रामस्थांनी आक्षेप घेत रोष व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोंभूर्णा पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यामुळे बऱ्यापैकी प्रकरण शांत झाले.
ग्रामसभेत उपस्थित असलेल्या साधारण १६० महिला व पुरुषांनी नाहरकत देण्याच्या संबंधित विरोध दर्शविला. यावेळी ज्यांना आक्षेप नव्हता असेही यावेळी चुप्पी साधून मुकसंमती दिली होती. शेवटी ग्रामपंचायतनी सरकार मान्य चिल्लर देशी दारूचे दुकान सुरू करण्याच्या संदर्भात नाहरकत नामंजूर करण्यात आले. गावात व्यसनमुक्ती च्या दिशेने व गावाच्या भविष्यासाठी पुढाकार घेणाऱ्या विजय ढोले व युवकांचा तसेच महिलांचा कौतुक केल्या जात आहे.