🌄 💻

💻

चंद्रपूर-मूल महामार्गावर भीषण अपघात #accident


चंद्रपूर:-  चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली-अजयपुर जवळ दोन ट्रक चा भीषण अपघात झाल्याची घटना दि. १९ मे ला रात्रौ. १० ते ११ च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनाला आग लागली असून मूल-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

अपघातात 4 जणांचा मृत्यू #death #accident

या अपघातात 1 ट्रक हा डीझल ने भरलेला टँकर तर दुसऱ्या ट्रक मध्ये लाकडे भरलेली होती त्यामुळे आगीने भीषण भडका घेतला. आगीने भीषण रूप धारण केल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहेत. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली असून आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु या झालेल्या अपघातात दोन्ही चालकांच काय झालं असेल हे अद्याप कळू शकले नाही. सविस्तर बातमी आधार न्युज नेटवर्क च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवली जाईल.


 चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अजयपूर गावाजवळ काल रात्री 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली होती. अपघातानंतर भीषण आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली होती. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आग विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत