Click Here...👇👇👇

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे अमर रहे च्या गर्जनांनी चित्रपट गृह दणाणले #chandrapur #warora

Bhairav Diwase
वरोरा:- शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवन पटावर आधारित चित्रपट "धर्मवीर" पाहण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्रपट गुहामध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय "बाळासाहेब ठाकरे" ,"आनंद दिघे" अमर रहे आणि "जय भवानी जय शिवाजी" च्या घोषणा दिल्या यामुळे चित्रपट गृह व परिसर दणाणून गेले होते.

सदर चित्रपट शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाहता यावा यासाठी दिनांक १८ मे रोजी सायंकाळी सहा ते नऊ च्या शोची संपूर्ण तिकिटे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी स्व खर्चाने बुक केली होती. तसेच चित्रपट गृह व परिसरात भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते.

दरम्यान चित्रपट सुरू होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यावेळच्या कठीण प्रसंगी शिवसेनेचे काम करणारे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे, राजन विचारे या सर्वांच्या कार्याचे कौतुक केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनिष्ट राहून शिवसेना संघटन वाढवले. यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट बघून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यापासून बोध घ्यावा आणि आपले कार्य उंचवावे असे आवाहन त्यांनी केले.
तसेच शिवसेना प्रेमी जनतेकरिता आपण यापुढे आणखी काही शो बुक करणार असून शिवप्रेमी जनतेकरिता ते विनामूल्य उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.