जाहिरात... Advertisement... विज्ञापन

प्राचार्य रडके यांना भावपुर्ण निरोप.

प्राचार्य रडके यांना भावपुर्ण निरोप.


मुल:- नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालय व व्यावसायीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. एल. रडके हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने आयोजित निरोप समारंभातून त्यांना भावपुर्ण निरोप देऊन सत्कार करण्यात आला. शि. प्र. मंडळाच्या राजोली, मूल, अंतरगावातील विविध शाखांमधून 32 वर्षाचे प्रदिर्घ सेवेनंतर श्री. रडके दिनांक 31 मे रोजी  निवृत्त झाले आहेत.

    या निरोप समारंभ प्रसंगी प्रा. किसान वासाडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा. महेश पानसे, प्रभाकर धोटे, श्री. मुंडरे, हेमन्त सुपनेर, श्री.मोडक, सुनील नागपूरे यांचेसह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शिक्षक, प्राध्यापक यांनी श्री.रडके यांना निरोप देऊन भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे संचालन करून आभार शिक्षक श्री. मोडक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत