जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शेतमजूराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू #chandrapur #tigerattack #mul


मुल:- शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेत मजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ कारु मरापे वय ४३ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जावुन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक रामभाऊ मरापे याच्या कुंटूबियास वनविभागा तर्फे आर्थिक मदत देण्यात आल्याची माहीती वन परीक्षेञ आधिकारी घनश्याम नायगमकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत