जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बर्लीनची संधी हुकलेल्या घात चित्रपटात पोंभूर्ण्याचा कलावंत #pombhurna


घात चित्रपटाचा प्रदर्शित होण्यापूर्वीच घात

वैदर्भीय कलावंताच्या कलेला निर्मात्याकडून लागला ब्रेक
पोंभूर्णा:- वैदर्भीय कलावंताला घेऊन बनविण्यात आलेला घात चित्रपट निर्मात्यांच्या हेकेखोरपणामुळे प्रतिष्ठीत बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्याची संधी हुकली असल्याने विदर्भातल्या मातीतील कलावंताच्या कलेला ब्रेक लागला आहे. नक्षलवाद, आदिवासींचे कौशल्य, थरार व अस्सल झाडी बोलीचा असलेला घात चित्रपटाचा मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच घात झाल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील कलावंतावर अन्याय झाला आहे.
विदर्भातील कलावंतांना घेऊन लेखक दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांनी झाडीबोलीतील घात ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. दृश्यम फिल्म व जिओ स्टुडिओ ह्या कंपनीने निर्मिती केलेल्या या चित्रपटाला नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडून पुरस्कार मिळाला. तसेच प्रतिष्ठीत बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये घात चित्रपट दाखविण्यासाठी आमंत्रण आले होते. २०२१ मध्ये फोरम सेक्शन मध्ये निवड झालेला व भारताकडून पाठविलेला घात हा चित्रपट एकमेव होता. मात्र चित्रपटाची सहनिर्माती कंपनी जिओ स्टुडिओ ने घात चित्रपट बर्लीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊच दिला नाही. आता तर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीच अडथळा निर्माण करीत आहेत.
🆗
जिओ स्टुडिओ घात या चित्रपटाची सह निर्माती कंपनी आहे. चित्रपट बनविण्याचा खर्च कंपनीने केला असल्याने. चित्रपट प्रदर्शित करण्याचा अधिकार करारानुसार त्याचाच असला तरी चित्रपट रोकणे म्हणजे वैदर्भीय कलावंताच्या कलांना स्टेज मिळूच नये असाच प्रकार निर्मात्यांकडून केल्या जात आहे.
घात हा मुख्यतः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद, आदिवासींचे जगणे, आदिवासींचे कला, कौशल्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रामुख्याने गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, नागपूर येथील छोट्या छोट्या गावातील कलावंतांनी काम केले आहे. हा चित्रपट म्हणजे विदर्भातील ९५ टक्के कलावंतांना घेऊन बनविलेला चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास गडचिरोलीतील समस्या, आदिवासींचे प्रश्न, पोलिस व नक्षलवाद याचे वास्तव उघड होतील.
पोंभूर्णा येथील धनंजय मांडवकर हा घात ह्या चित्रपटात काम केलेला आहे.तो १६ वर्षांपासून रंगभूमी, फिल्मसृष्टीत अभिनय करतोय.त्याच्या शार्टफिल्म्स ला पुरस्कार मिळाले आहेत. घात या मराठी चित्रपटात त्याला मोठी संधी मिळाली. मात्र निर्मात्यामुळे हा चित्रपट अडकला असल्याने मोठी गळचेपी झाली आहे.
जीओ स्टुडिओ ने घात फिल्म चे बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणारे प्रदर्शन थांबविले. ही वैदर्भीय कलावंता साठी फार मोठी शोकांतिका आहे. हा कलावंताच्या कलेवर होणारा अन्याय आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सिने जगताच्या मुख्य प्रवाहात उडी मारणे हे सहज शक्य नव्हते.चित्रपट प्रदर्शित न होणे हा आमच्यावर अन्याय आहे.
धनंजय मांडवकर, पोंभूर्णा
घात चित्रपटातील कलावंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत