Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोलिसांचे प्रसंगावधान, वाचवले दोघांचे प्राण #chandrapur #chandrapurpolice


रस्त्यावर वेदनेने विव्हळत असणाऱ्यांसाठी 'ते' ठरले देवदूत
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी शासकीय कामाकरिता चंद्रपूरला जात असताना मूल - सिंदेवाही मार्गावरील चितेगाव फाट्याजवळ गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात दोन जण जखमी अवस्थेत तिथेच वेदनेने विव्हळत पडले होते. पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी लगेच दोघांनाही अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची वेळेवर देवदूतासारखी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींना जीवनदान मिळाले.
संदेश देवगडे व उमेश बोरकर असे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सिंदेवाही- मूल चितेगाव फाट्यानजिक रोडवर मूलकडून सिंदेवाहीकडे चारचाकी गाडीने जात असताना नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आदळली. यात चालक किरकोळ जखमी तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. चालकाने कसाबसा टोलफ्री १०८ वर कॉल केला; मात्र रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता.
ते दोघेही तसेच वेदनेने विव्हळत पडून होते. अगदी त्याचवेळी ब्रम्हपुरी पोलिसांची गाडी चंद्रपूरला शासकीय कामाकरिता जात असताना त्यांना हा अपघात दिसला. पोलीस कर्मचारी संदेश देवगडे व उमेश बोरकर यांनी लगेच जखमींना आपल्या पोलीस गाडीत टाकून मूल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन यावेळी पहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत