हे विचखटल्या वेड्या मना
जरा सावरून घेना स्वतः ला
का भिरभिरतो भुंग्या सारखं
नभ दाटून येतील ना पुन्हा
ऋतू जसे बदलत असते
तस तू सुद्धा बदल ना
जे मिळणार नाही माहित असून ही
त्याचच विचार करण हे
तूला वाटत नाही का गुन्हा?
जग बदलतोय रे वेड्या
तू समजून का घेत नाही
स्वतः च्या जिवा आधी या जगी
परवा कुणी कुणाची करत नाही
नको पडू रे या प्रेमाच्या विळख्यात
यश प्राप्ती मिळणार नाही
कर लक्ष केंद्रित तुझ्या ध्येयावर
तू जग जिंकल्या शिवाय राहणार नाही !