Top News

पोलिसांना चकवा देत तलावात मारली उडी #chandrapur #rajura

आरोपीनं केला आत्महत्येचा प्रयत्न
राजुरा:- राजरा पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाचखोर पोलिसानं गस्त घातलेल्या पोलिसांना चकवा देत पळ काढला. त्यानंतर त्या आरोपी पोलिसानं नगरपरिषदेच्या समोरील तलावात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
राजेश त्रिकोलवार असं आरोपीचं नाव आहे. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने तलावात जाऊन आरोपी राजेशला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. या संपूर्ण घडामोडीमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांना ५० हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक चमुच्या ताब्यात होते. बल्लारपूर येथील एका तक्रारकर्त्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार केली.
त्यानंतर नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील पानटपरीवर सापळा रचला. त्यात राजेश त्रिकोलवार ५२ व सुधान्शु मडावी ४५ वर्षे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ५० हजाराची लाच घेतांना अटक केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने