(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील सिंगडझरी गावाशेजारी सर्रास दिवसाढवळ्या विना परवाना मुरूम तस्करी सुरू आहे. मात्र स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होण्याचे लक्षण दिसताहेत. दुर्लक्ष होण्यामागच्या लक्षणाचे गुपित रहस्य अजूनही कळले नाही. काही लोकसेवक मोठ्या गर्वाने सांगतात की मुरुम तस्कराचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व आमदार, खासदाराशी संबंध आहेत. सामान्य माणूस काहीच करु शकत नाही. संबंध जरी असले तरी आमदार, खासदार, मंत्री त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी हे त्याला शासनाचे महसुल बुडवून चोऱ्या करण्यास सांगतात का? हि खूप मोठी शंका निर्माण झाली आहे.
मुरुमाचे उत्खनन सुरू असताना तिथून थेट संबंधित स्थानिक अधिकारी यांना फोन वरून संपर्क साधला असता त्यांनाचा परवाना आहे की नाही याची माहिती नाही. त्यांच्या कार्यक्षेत्रात हे कृत्य चालू असताना सुध्दा त्यांनी कुठलीही कारवाईसाठी तत्परता दाखवली नाही. तसेच काही वेळात तालुका पातळीवरील अधिकारी यांना फोन वरून संपर्क केला असता त्यांनी बघतो मी असे आश्वासन दिले. फोन कट होताच काही वेळातच घडलं हे वेगळचं उत्खनाच्या ठिकाणाहून जेसीबी आणि ट्रक बाहेर काढण्यात आले. व काही क्षणातच जीकडे तिकडे पाठविण्यात आले. नेमका हा प्रकार सुनियोजन असल्याविना शक्य आहे का? हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात वावर करत आहे.
जेसीबी आणि ट्रक गायब होईपर्यंत मुरुम तस्कर हा वासेरा बसस्टॉपवर आपल्या गाडीतून संबधितांना सूचना देन्याचे काम बजावतो.तसेच जेव्हा उत्खननाच्या ठिकाणांहून जेसीबी आणि ट्रक गायब होते. नंतर तेवढ्यात मुरुम तस्कराची गाडी सिंदेवाहीच्या दिशेने निघते. आणि क्षणातच पोलीस गाडी वासेरा येथे पोहचते.पोलीस गाडी सिंगडझरीला जातांना वाटेत एक ट्रक सुध्दा मिळतो मात्र त्यांना कुठलीही विचारणा न करता गाडी निघून जाते. ह्या प्रकारावरून शंका निर्माण होते की हे कृत्य नियोजित होते काय? आणि हे जर मुरुम तस्करिचे काम नियोजीत होत असणार तर शासनाने नेमलेल्या महसूल समितीतील पदाधिकारी आणि सदस्य यांना वरीष्ठ अधिकारी त्या उत्खननाच्या जागेची विभागीय चौकशी करण्यास भाग पाडून संबंधितावर कारवाई करतील काय? तथा जनतेला प्रशासनाच्या बुडत्या महसुलाला वाचवनारे अधिकार्यांचे चेहरे जनतेला दाखवतील काय? असे आगळेवेगळे प्रश्न सुजाण नागरिकांच्या मनात वावर करत आहेत. जनता प्रश्न करत आहे उत्तर देण्यास कुणी तयार आहेत का? मुरुम तस्करी करणाऱ्या ट्रक वरती ट्रॉफिक पोलीस अधिकारी पुढच्या आणि मागच्या बाजूला नंबर प्लेट लावण्यास भाग पाडतील की नाही? सिंगडझरीवरून पिपरहेटी मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद ही वनविभागाच्या गेटवर केली जाते.
त्याचप्रमाणे दिवसभर मुरूम तस्करी करणाऱ्या सर्व ट्रकची नोंद झाली आहे का? चोरी करणाऱ्याना नेमके सिंदेवाही तालुक्यातील जनतेला आंधळे समजुन हे कृत्य करण्यास प्रोत्साहन मिळते कुणाचे? या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास तयार असलेले अधिकारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा अशी जनतेकडून आग्रही मागणी होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत