डेबू सावली वृद्धाश्रम येथे यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक १४ मे २०२२ ला स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास,विचार-वारसा पुढे वाढत रहावा याच उद्देश्याने जयंती दिनानिमित्त यंग थिंकर्स चंद्रपुर टीमच्या वतीने स्थानिक चंद्रपुर येथील डेबू सावली वृद्धाश्रम येथे उपक्रम घेण्यात आला.या निमित्त वृद्धाश्रम मधील वरिष्ठ मंडळी यांना फळ व मिठाई वाटप करण्यात आले.
संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प-अर्पण करून अभिवादन करण्यात आले.टीम तर्फे सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.अनोखा असा उपक्रम पहिल्यांदाच वृद्धाश्रम मधे घेण्यात आला,यामुळे आम्हाला ही खुप आनंद झाला असे वृद्धाश्रम मधील वरिष्ठ मंडळी यांनी मनोगत व्यक्त केले व टीमचे कौतुक केले.
याप्रसंगी यंग थिंकर्स चंद्रपुरचे सर्व सदस्य प्रामुख्याने रोशनी नगपुरे, मोहिनी चावले, तनुश्री धवले, काजल पाऊणकर, स्वरा राऊत, निशिकांत आष्टनकर, आकाश वानखेडे, वैभव निंबाळकर, साहिल आष्टनकर, निहांश कथलकर व शुभम निंबाळकर उपस्थित होते. तसेच प्रा.शितल चव्हाण मॅडम, शंकर वांढरे, वैष्णवी राऊत यांनीही सहकार्य केले.