💻

💻

मासे पकडण्याकरिता गेलेल्या दोन इसमांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू #death


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- मासे पकडण्याकरिता गेलेल्या दोन इसमांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथे शनिवारी दुपारी घडली.
अशोक रामपाल यादव (४२) व रोहीत राहुल मलय्या (८) अशी मृतांची नावे असून ते माजरी येथील एकता नगर वस्तीतील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी हे दोघेही अन्य तीन इसमांसोबत मासे पकडण्याकरिता गावाजवळ च्या वर्धा नदीवर गेले. तेथे मासे पकडत असताना अशोक व रोहित दोघेही नदीच्या पात्रात असलेल्या डोहाचा अंदाज न आल्याने बुड़ुन मरण पावले.
या घटनेची माहिती माजरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नावाड्यांच्या मदतीने दोघांचीही प्रेते शोधून काढली. त्यानंतर प्रेते वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली.
सदर प्रकरणी माजरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत