शिवछत्रपती गुणीजन गौरव राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार-२०२२ ने चंद्रपुर जिल्ह्यातील शुभम निंबाळकर सन्मानित.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित शिवछत्रपती गुणिजन गौरव महासंमलेन, राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा -२०२२ संगमनेर, जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
शैक्षणिक व युवाक्षेत्र यात केलेल्या कार्याची दखल घेत या संस्थेच्या वतीने "शिवछत्रपती युवारत्न पुरस्कार-२०२२" ने चंद्रपुर जिल्ह्यातील शुभम प्रदीप निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातून चांदा ते बांदा अश्या ४५ महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिन्ना पुरस्कृत करण्यात आले.
उत्कृष्ट अश्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात (अध्यक्ष, एकवीरा फाऊंडेशन),  इंद्रजीतभैय्या थोरात (स.म.भा.स.थो.का.लि.), मा.दिपकदादा पाटील (अध्यक्ष,वारणा फाऊंडेशन ), मा.गोकुळजी दौड (सभापती पं.स.पाथर्डी ), मा.प्रसन्न पोपटराव पवार ( हिवरेबाजार ), मा.नाथाभाऊ शेवाळे (जनतादल अध्यक्ष ), मा.विकास नवाळे सर (मुख्यकार्यकारी अधिकारी संगमनेर ), मा.श्रद्धा ढवन, (कृषी कन्या पारनेर ), मा.ज्ञानेश्वरजी सानप, (अध्यक्ष, संजीवनी फाऊंडेशन शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य ) इत्यादि. मान्यवर उपस्थित होते.
मिळालेल्या पुरस्कारसाठी शुभम निंबाळकर यांचे सर्वत्र शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.