Top News

देवाडा खुर्द‌‌‌ येथील पानफळीवर बाल कामगार #chandrapur #pombhurna


बालकामगार कायद्याची ठेकेदाराकडून पायमल्ली; ठेकेदारावर कारवाईची मागणी
पोंभूर्णा:- जंगलव्याप्त ग्रामीण भागात तेंदूपत्ता हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पान फळीवर आणलेल्या तेंदूपत्त्याचे पुडके पलटविण्यासाठी बाल कामगाराचा वापर करण्यात येत आहे. पन्नास रूपयाचे लालच दाखवून लहान लहान मुलांकडून पुडे पलटविण्याचे काम करुन घेतल्या जात आहे.
डोंगर हळदी युनीटच्या देवाडा खुर्द पान फळीवर कंत्राटदारांक़डून बालकामगार संरक्षण कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रकार पोंभूर्णा तालुक्यात पाहायला मिळत आहे. बालकामगारावर अंकुश लावणारी यंत्रणा नेमकी काय करीत असते असा प्रश्र्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. उन्हाळा सुरू होताच साधारण एप्रिल पासून जंगल व्याप्त ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होत असते. भल्ल्या सकाळीच जंगलात जाऊन तेंदूपान तोडण्यासाठी महिला व पुरुष जातात. तेंदुपान तोडून आणल्यानंतर घरचे सर्व मंडळी पुडके बांधून झाल्यावर पुडे फळीवर नेऊन दिले जाते. पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील तेंदुपान संकलन युनिट येथे तीन लक्ष पुडके घ्यायचे आहे.
आतापर्यंत एक लक्ष पुडके घेण्यात आले. तेंदूपत्ता पुडके वाळविण्यासाठी व पलटविण्यासाठी देवाडा खुर्द‌‌‌ येथील फळीवर लहान लहान मुलांकडून नाममात्र पन्नास व शंभर रूपये देऊन कामगार म्हणून वापर केल्या जात आहे. बाल कामगारांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे असे असताना तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या कंत्राटदारांकडून बालकामगाराचा वापर करून कायदा मोडल्या जात असल्याचे चित्र आहे.बाल कामगारांचा वापर करणाऱ्या तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या कंत्राटदारावर बाल कामगार संरक्षण कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने