💻

💻

कामगार राज्यमंत्री बच्चू कडू चंद्रपूर दौऱ्यावर #chandrapur


चंद्रपुर:- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार,17 मे 2022 रोजी रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह राजुरा येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्याकडे प्रस्थान. रात्री 9:30 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर आगमन व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती, भोजन व मुक्काम.
बुधवार, 18 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर कोलामांशी समस्यांवर चर्चा. सकाळी 9 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथुन चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 3:30 वाजता चंद्रपूर येथे कामगारांचा आनंद मेळावा. सायंकाळी
6:30 वाजता नागपूरकडे प्रयाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत