युवा नेते मोहीत डंगोरे ने केला लोकांचे पाण्याची समस्याचे निराकरण #chandrapur

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की दि:-१६/५/२०२२ डॉ. राजेंद्र प्रसाद वार्डातील हँन्ड पंप बोरवेल २ महिने पासून बंद होती वार्डातील नागरिकांना उन्हाळ्या मुळे पाण्यासाठी खूप त्रास होत होता. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो मोहीत डंगोरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना या विषयाबद्दल माहिती दिली.
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ नगर परीषद अधिकाऱ्यांना सूचना दिली व नगर परिषद कर्मचाऱ्याकडून हँन्ड पंपची दुरुस्ती करुण लोकांना पाणी उपलब्ध करण्यात आले. अशाप्रकारे युवा नेता मोहीत डंगोरे कडून लोकांची पाण्याची समस्याचा निराकारण करण्यात आली. या वेळी उपस्थित वॉर्डातील नागरिकांनी मोहीत डंगोरे यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत