नेपाळ येथे आयोजित कराटे स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अश्विनी नरड ला आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली विशेष आर्थिक मदत #chandrapur


नेपाळ देशात होत असलेल्या कराटे (कुंफु) स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यस्तरीय टीमचे नेतृत्व करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील कु. अश्विनी गजानन नरड हीची निवड झालेली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून अश्विनी कराटे करिता सतत परिश्रम घेत आहे. तिला नेपाळ येथे स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विशेष आर्थिक मदत केली आहे.
ही मदत महानगर भाजपा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे मार्फत अश्विनी ला सोपविण्यात आली आहे. याप्रसंगी रामकुमार आकापेल्लीवार, धनंजय बोधे, निलेश खाडे, डॉ.यशवंत कन्नमवार आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत