🌄 💻

💻

भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनी सुमित्र नगर बालोद्यान व हायमास्ट लाईटचे उद्घाटन समारंभ #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या प्रयत्नाने व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आशिर्वादाने भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनी सुमित्र नगर बालोद्यान व हायमास्ट लाईटचे उद्घाटन समारंभ दि. १६ मे ला सायंकाळी ६ वाजता सुमित्र नगर बालोद्यान, सुमित्र नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर, महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित आघाडी महानगर अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, वृंदावन नगर बृध्दविहास समिती सचिव यशवंत उके, सुमित्र नगर समिती अध्यक्ष विनोद डबले, भारतीय जनता पार्टी अनुसूचित आघाडी महानगर महामंत्री जितेंद्र वाकडे, रामचंद्र कासुलकर, लक्ष्मीकांत कांबडे, शांताराम पाटील, ॲड. हरीश कासुलकर, मारोतराव हुलके, प्रभाकरराव आक्केवार उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत