Top News

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी. एस. आर फंडातून अमलनाला डॅमचे खोलीकरण करा #chandrapur

जलसाठा, भू- जल पातळी वाढणार वि कॅन फौंउडेशनची राज्य मंत्री बच्चू कडू यांना निवेदनातून मागणी

कोरपना:- राज्यमंत्री बच्चू कडू सद्या चंद्रपूर जिल्याच्या दौऱ्यावर आहे. जिवती तालुक्यातील कोलाम गूडा येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी भेट दिल्या, गडचांदूर लगत असलेल्या अमलनाला डॅम प्रकल्प अनेक वर्षा पासून या ठिकाणी आहे ,डॅम निमिर्ती नंतर संपूर्ण गाळ उपसा झालेला नाही, तसेच शेत जमिनी साठी फार कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे, गाळ उपसा झाल्यास परिसरातील भू- जल पातळी वाढेल, गाळ उपसा झाल्यास त्याचा वापर शेती मध्ये केला तर यांचा लाभ शेकऱ्यांना जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मदत होईल.

अमलनाला डॅमचे गाळ उपसा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी.एस.आर फंडातून  करावा व शेतकऱ्यांना शेती साठी पाण्याचा अधिक लाभ मिळवून देण्यासंदर्भात वि कॅन फौंउडेशन सदस्यांनी  राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन  निवेदनातून मागणी केली असून या विषयावर मंत्री बच्चू कडू यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली, निवेदन देताना वि कॅन फौंउडेशनचे डॉ.प्रवीण लोणगाडगे,प्रितेंष मत्ते, वैभव राव , भोयर, हर्षल ढवळे,प्रहरचे सतीश बिटकर व शहरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने