Click Here...👇👇👇

सरदार पटेल महाविद्यालयात निःशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागव्दारे एक माह क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे समारोप समारंभ दिनांक ३१ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कित्तीवर्धन दिक्षीत माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा सहसचिव सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, प्रमुख अतिथी राजेश नायडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू, महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. कुलदीप गोंड, शिबिराचे प्रशिक्षक चेतन इदगुरवार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. विजय सोमकुंवर यांनी म्हणाले की, समाजातील काही विद्यार्थी हे क्रीडा शिबिराचा आर्थिक परिस्थितीमुळे सहभागी होऊ शकत नाही अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या निशुल्क शिबिराचा लाभ घेतला, संस्था अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनसाठी सदैव प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने या शिबिरात सहभागी झाले.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी समारोप समारंभात आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की मागील 13 -14 वर्षापासून आमचे महाविद्यालय दरवर्षी नि: शुल्क क्रीडा शिबिराचे आयोजन करीत असते. स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांचे स्वप्ना नुसार समाजातील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा शिबिराचा लाभ होऊन विद्यार्थी हा अनुशासित राहाव, निर्व्यसनी राहावं व सदैव निरोगी राहून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार व्हावेत या उद्देश ठेवून या शिबिराचे आयोजन केले होते.

समारोप समारंभ प्रसंगी राजेश नायडू यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, खेळ आपल्याला अनुशासन शिकवते, खेळाडूंनी आपल्या खेळाप्रती आदर ठेवावा व प्रत्येक खेळाडूंनी खेळ खेळतांना आपले ध्येय निश्चित करावे व आपल्या गोल पर्यंत पोहचावे. खेळांमुळेच आपल्याला जीवनात संकटमय परिस्थितीचा कोणताही ताणव न बाळगता सामना करता येते. खेळ आपल्याला बरेच काही शिकवते म्हणून खेळाडूंमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक खेळाडूंनी निर्व्यसनी रहावे व अशाप्रकारच्या शिबिराचा लाभ घेऊन उच्चस्तरीय स्पर्धेकरिता सहभाग घ्यावा असा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात डॉ. कित्तीवर्धन दिक्षीत म्हणाले की, चंद्रपूर शहरातील क्रीडा संस्कृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी पालकांचा क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला असल्यामुळे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर नव संजीवनी ठरले, क्रीडा संस्कृतीला गतिशील अशी चालना मिळेल व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर यामुळे मुलांमध्ये खेळाचे महत्व लक्षात आले. मुल व मुलींना मैदानावर येण्याची आवड निर्माण झाली याचा सर्वात मोठा फायदा या क्रीडा शिबिरामुळे झाला आहे.

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागव्दारे एक माह क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी पलक शर्मा, आरुष कुकडपवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू राजेश नायडू यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रशिक्षक म्हणून धनपाल चनकापुरे, विशाल सोलनकर, सुरज परसुटकर, चेतन इदगुरवार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती यादव, नुरसबा सिद्दीकी, प्रास्ताविक डॉ. विजय सोमकुंवर यांनी केले. तर आभार डॉ. कुलदीप गोंड यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.