Top News

माणिकगड किल्ला बनतोय प्रेमीयुगुलांसाठी "लव्हर पॉइंट" #chandrapur

कोरपना:- तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे माणिकगड किल्ला व परिसर सध्या प्रेमीयुगुलांसाठी "लव्हर पॉइंट" बनले आहे. या ठिकाणी सुरू असणाऱ्या ईल चाळ्यांचा त्रास येणाऱ्या भाविक भक्तांना सहन करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गडचांदूर-जिवती रोडवर असणाऱ्या माणिकगड किल्ला हे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी विष्णूचे मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पौष महिन्यात महिनाभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. या भागातील निसर्ग अतिशय समृद्ध असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतात. गडचांदूर शहरापासून हे ठिकाण अवघे १२ किमी व जीवतीपासून ८ किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी सहज कोणीही पोहचू शकते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात प्रेमीयुगुलांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कॉलेज तरुण तरुणींची संख्या जास्त आहे. डोंगर टेकड्या, खोल दऱ्या, घनदाट जंगल यामुळे एकांत मिळतो. अशा वातावरणात प्रेमीयुगुलांची ईल चाळे सुरू असतात. त्याचा परिणाम येथे येणाऱ्या पर्यटकांवर देखील होत आहे. ऐतिहासिक वास्तूचे प्रेमीयुगुलांकडून विद्रुपीकरण करण्यात येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून किल्ल्या शेजारी व परिसरात प्रेमीयुगुलांची वर्दळ दिसून येत आहे. माणिकगड परिसरात नुकत्याच एका प्रेमीयुगुला कडून प्रेमप्रकरणातून युवकाने मुलीवर चालूहल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. https://www.adharnewsnetwork.com/2022/05/attack-chandrapur.html अशा घटना पुन्हा तिथे घडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रेमीयुगुलांकडून भाविक भक्तांना शिवीगाळ, दमबाजी करण्यात येत असल्याने माणिकगडच्या भाविक भक्तांना हकनाक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी यापूर्वी एकांकात येणाऱ्या भक्तांना प्रेमीयुगुलाकडून शिवागीळ करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यासह या भागातून प्रवास करताना कोण? कशासाठी? या ठिकाणी आलेले आहेत. याचा अंदाज नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिवती-कोरपना पोलिसांनी वेळीच या ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त होणे गरजेचे......

ऐतिहासिक धार्मिक माणिकगड किल्ल्यावर येणाऱ्या भाविक भक्तांना प्रेमीयुगुलामुळे मनस्ताप होत आहे. ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तसेच धार्मिक स्थळांचे पावित्य राखण्यासाठी प्रेमीयुगुला चा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने